fbpx

GuitarGiri.com

step by step गिटार शिकण्यासाठी..

मराठीतील पहिल्या ONLINE गिटार COMMUNITY मध्ये सहभागी व्हा!

तुमच्या आवडीमधून प्रेरणा घेताना..
“GuitarGiri हा शब्द सुरुवातीला कदाचित Casual वाटेल. जसं प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला गिटार शिकणं Casually आवडत असतं, अगदी तसंच. एकदा तुम्ही गिटार वाजवायला घेता आणि तुम्हाला लक्षात येतं की हा गिटार सोबतचा प्रवास एखाद्या पर्वताप्रमाणे आहे. आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल गिटार'गिरी' मागचा खोल, पण उंच अर्थ.”

गिटार टिप्स सर्व प्रकारच्या गिटार प्रेमींसाठी

01.

Beginner

Et auctor ac sed tincidunt vel, non fames blandit quisque viverra faucibus nec ac eu aenean mattis quis eget mauris ultrices pharetra ultrices amet.

02.

Intermediate

Donec interdum lorem maecenas habitant venenatis tellus nunc sit orci magnis nec aliquam cras arcu et laoreet sagittis, viverra at eget at ac nunc.

03.

Advanced

Ac ultrices ullamcorper leo orci eget arcu aliquam malesuada morbi id enim amet imperdiet curabitur feugiat platea pharetra, eu penatibus vitae lobortis.

गिटारचं मैत्रीपूर्ण शिक्षण ..

सर्व मराठी गिटार प्रेमींसाठी

महाराष्ट्रात लोककलेला खूप मानाचं स्थान दिलं  जातं. यात असणारी विविधता रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत असते. पण याचा अर्थ असा नाही ना की त्या सेम व्यक्तीला वेस्टर्न वाद्य आवडणारच नाही! इन फॅक्ट मी तर सांगीन, गेल्या ५-६ वर्षात मला अशी बरीच जणं भेटली ज्यांना मराठी गाणी गिटारवर वाजवायला  शिकायची होती.  तुम्ही त्यातलेच एक आहात तर अभिनंदन.. योग्य ठिकाणी आला आहात तुम्ही!

यात नक्की काय काय शिकणार आम्ही ?

'गिटारगिरी'च्या कोर्सेस् ची थोडक्यात माहिती..

Peaceful Guitar Formula

गिटार शिकताना नक्की कोणत्या गोष्टींना, कोणत्या क्रमाने, किती महत्व द्यावं  हे  माहीत नसेल तर गिटार शिकण्याचा प्रवास थोडा चिडचिडा होणारच. यावर रामबाण उपाय म्हणजे हा कोर्स!

Fretboard Clarity Blueprint

नवीन जागी माणूस रस्ता  माहीत नसल्यामुळे हरवतो , अगदी तसंच सुरुवातीला आपण गिटार फ्रेटबोर्ड मध्ये हरवून जातो. त्यातून बाहेर येण्याच्या टॉप टिप्स यात मिळतील.

Chords Formation Blueprint

कोणीतरी सांगितलंय म्हणून आहे तशी कृती करणारे, आणि ती कृती अशीच का आहे, याचा शोध घेणारे. यात झटक्यात प्रगती कोणाची होते हे  वेगळं  सांगायची गरज नाही. गिटारच्या कॉर्डस् अशाच का पकडतात याची उत्तर यात मिळतील.

Strumming Formula Simplified

स्ट्रमिंग पॅटर्न प्रॅक्टिस कोणत्या प्रकारे करावी म्हणजे गाण्याचा स्ट्रमिंग पॅटर्न ओळखणं/ठरवणं सोप्पं जाईल? हा प्रश्न बऱ्याच जणांना सतावतो. त्याची उकल या कोर्स मध्ये होईल. 

Music Theory Mastery

गिटारमधून उमटणारे सुर कोणत्या लॉजिकने पटकन समजतील याची माहिती आपण या सेगमेन्ट मध्ये घेऊ ! 

Guitargiri Quick Start Guide

गिटार शिकताना सुरुवातीला बरेच जण कन्फ्युजन मध्ये  असतात की कुठली गिटार घेऊ, नक्की पहिला काय शिकू, सध्या मी Beginner आहे की Intermediate Guitarist या सर्वांची उत्तर या कोर्स मध्ये मिळतील. 

मी तर म्हणीन बिंदास शिका, पण त्या आधी मनाशी पक्का ठरवा की तुम्ही नक्की गिटार का शिकताय.
कारण तुम्ही ज्या कारणासाठी गिटार…

नवीन नवीन गिटार शिकताना तुम्ही हा प्रश्न विचारणार हे साहजिकच आहे. मग मी म्हंटलं प्रत्येकाला तोंडी किंवा Chat वर उत्तरं देण्यापेक्षा इथे सविस्तर ब्लॉग लिहून काढू..

प्रशंसापत्र - Testimonial

इथे शिकलेले गिटारीस्ट 'यशवंत' बद्दल काय सांगतात..

4.6/5
"चार वर्षांपूर्वी मुलगा अमेरिकेला शिक्षणासाठी गेला पण त्याची गिटार मागे ठेवून . मग काय आयुष्यातील पोकळी भरून काढण्यासाठी सरांच्या प्रोत्साहनाने गिटार शिकायला सुरूवात केली. स्वान्त सुखाय.. खूप सुंदर प्रवास .. सरांचा संयम, माझ्या वयाला आणि दिनचर्येला झेपेल असा सराव , आवडती गाणी व हसत खेळत मार्गदर्शन.. आनंदाने जगण्यासाठी आणखी काय हवं ? चला तुम्ही पण या आनंद यात्रेत सामिल व्हा..."
पद्मजा बंगाले
4.8/5
"मला गिटार शिकून फक्त ५ महिने झाले आहेत . तसं बघितलं तर खुपचं छोटी journey आहे माझी एक guitarist म्हणुन तरी सुद्धा ही journey खुप meaningful होती असं मला वाटतं . एखादं गाणं फक्त कसं वाजवयच हे शिकलेच मी पण त्या गाण्याची रचना आणि गाणं मुळात कसं बनवतात हे देखील थोडं फार शिकले मी . I hope पुढे देखील मला असंच शिकता येईल ."
मानसी घळसासी
4.6/5
"यशवंत हो 🙂 ,
गले २ वर्ष मी गिटार शिकत आहे. गिटार सोबत ब-याच टिप्स सुद्धा मिळाल्या. यशबद्दल बोलायचं तर शिक्षकपेक्षा एक मित्रच आहे तो. क्लास मधला आत्तापर्यंतचा प्रवास म्हणायचा तर 'झक्कास' मी नक्कीच सल्ला देईन, तुम्हीही अनुभव घेऊन पहा"
लॉरन्स सातपुते
4.8/5
"मी आत्ता वयाच्या चाळीशीत माझं गिटार शिकण्याचं स्वप्न साकारतेय. हे सगळं फक्त आणि फक्त यशवंत सरांमुळे साकार होत आहे. त्यांची शिकवण्याची पद्धतच अशी आहे की कोणालाही अगदी लगेच समजेल. थेट गाणं वाजवण्यापेक्षा बेसिक वर जास्त भर दिला पाहिजे हा त्यांचा विचार मला खूप आवडतो."
संध्या क्षीरसागर

तर मग करायची का सुरुवात 'गिटारगिरी'ला ?

मराठीतील पहिल्या ONLINE गिटार COMMUNITY च्या कोर्सेस् ची अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली क्लिक करा!